आदिमाया सप्तशृंगी देवीचा दरबार पुन्हा एकदा बंद...

आई सप्तशृंगी देवीचे मंदिर :-
सप्तशृंगी देवीचे मंदिर...
             साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया आदिशक्ती आई सप्तशृंगी च मंदिर पुन्हा एकदा बंद.

आई सप्तशृंगी देवीचा भव्य दरबार :-

आई सप्तशृंगी देवीचा दरबार ...
            श्री क्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड -१ ९ संदर्भीय रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक ग्राम पंचायत , सप्तशृंगी गड यांनी जा क्र ०४/२०२१ नुसार जनता कफ्र्यु संदर्भात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट , सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने कोरोना संसर्ग टाळणे तसेच स्थानिक नागरिक व भाविक वर्गाच्या आरोग्य व जनसुरक्षेच्या हेतूने घेतलेल्या निर्णयानुसार श्री भगवती मंदिर दर्शन सुविधा ही गुरूवार दि . ०१/०४/२०२१ पासून सोमवार , दि . ०५/०४/२०२१ पावेतो संपूर्णतः बंद राहील . मात्र श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक सुरू असेल . तरी भाविकांनी सदर नोंद घेवून विश्वस्त संस्थेसह जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे . असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे व हे आव्हान सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ अतिशय काटेकोरपणे पळत असल्याचे आपल्याला दिसत आहेत. 

धन्यवाद ...

             मित्रांनो असेच माहितीपूर्ण ब्लॉक वाचण्याकरिता माझ्या ब्लॉकला FOLLOW व SUBSCRIBE नक्की करा कारण मी असेच माहिती पूर्ण ब्लॉक लिहीत असतो.

धन्यवाद...

- राज रघुवीर जोशी.

Raj Raghuvir Joshi

Hi, In This Website We Share You To Information Blogs, News and Much More For You For New Information Follow As And Shear Our Website ... - Thank You ...

Post a Comment

Previous Post Next Post