श्री क्षेत्र सप्तशृंगी गड :-
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे येथील कार्यरत समाजसेवक यांनी मदतीचा हात थोड्या प्रमाणात का होईना पुढे केल्याचे दिसून येत आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर 80 टक्के आदिवासी समाज असल्यामुळे यांचे फुल, हार, साडी - ओटीचे दुकाने आहे लॉकडाऊन झाल्यामुळे सप्तशृंगी गडावर कुठल्याही प्रकारचे भाविक येत नसल्याने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे काही समाजसेवक व यात्रेकरू यांनी थोड्या प्रमाणात का होईना सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे केला आहे
दिनांक १३ मे २०२१ रोजी सप्तशृंगी गडावरील समाज सेवक मयूर बेनके व मुंबईचे काही भाविक यांनी मिळून गावकऱ्यांसाठी ३५० कुटुंबांना किराणा किट वाटून ग्रामस्थांना थोडा दिलासा दिला आहे.
यावेळेस सरपंच रमेश पवार, समाज सेवक मयूर बेनके, विवेक बेनके, विजय बेनके, धनेश गायकवाड आदी उपस्थित होते.
मित्रानो या ब्लॉग मध्ये इतकच माझ्या WEBSITE FOLLOW व SUBSCRIBE नक्की करा आणि मित्रांनो असेच माहितीपूर्ण ब्लॉक वाचण्याकरिता माझ्या ब्लॉकला आसाच सपोर्ट करत रहा कारण मी असेच माहिती पूर्ण ब्लॉक तुमच्या करीता लिहीत असतो.
धन्यवाद...
- राज रघुवीर जोशी.
